स्व. सौ. विद्याताई अमर परबत यांच्या जयंती निमित्त तांदुळवाडी येथे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार संपन्न..
प्रतिनिधी अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथील अमर (सर) आबासाहेब परबत यांच्या पत्नी स्व. सौ. विद्याताई अमर परबत यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रथम विद्याताई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी ऋतिक अमर गवळी इयत्ता पहिली, शिवतेज महेश गवळी इयत्ता दुसरी, संचिता सचिन लंकेश्वर इयत्ता तिसरी, विजय बालाजी माने इयत्ता चौथी, तनुजा महादेव गवळी इयत्ता पाचवी, प्रतीक्षा सोमनाथ जाधव इयत्ता सहावी, संध्या भाऊसाहेब गवळी इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांना आदर्श व गुणवंत विद्यार्थी म्हणून ट्रॉफी व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भूमीन व आई-वडील नसणाऱ्या मुलांना परीक्षा पॅड देण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक वास्कर सर यांनाही आदर्श मुख्याध्यापक म्हणून ट्रॉफी व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी तांदुळवाडी गावचे सरपंच रणजितसिंह भैया पाटील, उपसरपंच किरण गवळी, ज्येष्ठ नागरिक आबासाहेब परबत, महिला व बाल विकास अधिकारी विशाल भोसले, अभिजीत परबत, अक्षय परबत, पोस्ट मास्तर ज्ञानेश्वर जाधव, शैलेश गवळी, महादेव दादा भोसले, प्रतिक परबत, पत्रकार अतुल गवळी, अजिनाथ कनिचे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तलाठी शिवाजी गवळी हे होते. कार्यक्रमाची सांगता गणेश परबत यांनी केली.