आ. बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तांदुळवाडी येथे ५५ जणांचे रक्तदान
अजिनाथ कनिचे / प्रतिनिधी
माढा तालुक्याचे भाग्यविधाते, विकासरत्न आमदार बबनराव विठ्ठलरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तांदुळवाडी ता. माढा येथे दि. ३१/०८/२०२३ रोजी श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी यांचे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आ. बबनराव शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी महिला व बालविकास अधिकारी मा.श्री.विशाल भोसले, तांदूळवाडी गावचे सरपंच रणजितसिंह पाटील, उपसरपंच किरण गवळी, जेस्ट नागरिक आबासाहेब परबत, नामदेव नाना भोसले, प्रताप भोसले, चंदक गवळी, विष्णू अनपट, पत्रकार अतुल गवळी, भाऊ खबाले, दादा गवळी व ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, ॲग्री ओव्हरसीयर घाडगे साहेब तसेच विठ्ठलरावजी शिंदे कारखान्याचे सर्व कर्मचारी व तांदुळवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.