अमळनेर तालुक्याला कोणतेही मंत्री पद नसताना देखील कृषी भूषण साहेबराव पाटलांनी आणला होता एवढा निधी..!
बाराही महिने पाणी नसणाऱ्या बोरी नदीवर त्यांनी मंजूर करून आणले होते, तीन- तीन पुल..
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर तालुक्याच्या सौंदर्यात भर घालण्यात मा. आ. कृषी भूषण साहेबराव पाटील. यांचा सिहांचावाटा आहेत हे ही तेव्हढेच खरे” शहरातील न.पा. हद्दीत एकूण ३८ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. काही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती आ . कृषिभूषणा साहेबराव पाटील यांनी दिली .
असे असताना अमळनेर च्या जाणते साठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातुन त्रिमिक्स पद्धतीच्या नव्या रस्त्यांची अनमोल भेट अमळनेरकरांना मिळणार या वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत 5 कोटी निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. हे काम लवकरच अमळनेर नगर परिषदे च्या माध्यमातून सुरु होईल असे ही त्यांनी सांगितले.
अमळनेर अमळनेर नगरपरिषद हद्दितील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नियोजन विभागाकडून ४९ कामांसाठी ३८ कोटी ५० लाख निधी तेव्हा २०१४ साली मंजूर झाल्याची माहिती आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी बोलताना सांगितली माहिती.
तें तर आज चे १०० कोटी.??
यात सर्वात मुख्य म्हणजे अमळनेर शहराच्या मुख्य आलेखावर येणाऱ्या धुळे , अमळनेर , चोपडा रा.मा. १४ कि . मी . ५० ते ५० मध्ये दुभाजक , विद्युतीकरण , सुशोभिकरण व रुंदिकरणासह नुतनीकरण करणे यासाठी ४ कोटी ४० लाख रुपये मंजूर केले होते. अमळनेर – ढेकू मांडळ रस्ता ५४ कि.मी ( तहसील कार्यालयापासून ) अमळनेर पोलीस स्टेशनपर्यंत दुभाजक विद्युतीकरण , सुशोभिकरण , फूटपाथ व कॉक्रिटीकरणासह नुतनीकरणासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले होते. यात विशेष म्हणजे १२ महिने पाणी नसणाऱ्या बोरी नदीवर साहेबराव पाटलांनी तिसरा पुल ही करून आणला होता मंजूर..
रा.मा .४ ९ वर श्रीसंत सखाराम महाराज समाधीस्थळाजवळील किल्लाटेक ते पैलाड येथे मोठा पूल बांधकामासाठी ९ कोटी ६० लाख रुपये मंजूर , रा.मा .६ गांधलीपुरा अमळनेर बोरी नदीवर जोड रस्त्यासह मोठा पूल बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत . शहरातील अमळनेर – चोपडा व पारोळा जाण्यासाठी तीनही बांधकाम झाल्यास शहरातील दगडी दरवाजाजवळ होत असलेली वाहतुकीची कोंडी दूर करण्याचे काम होते. यात फरशीरोड परिसरात बौद्ध चौकात ( स.नं .३३७२ ) काँक्रिट रस्त्यासाठी ६ लाख रुपये , सानेनगर ते सप्तश्रृंगी माता नगरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ लाख ६८ हजार रुपये , सानेनगर ते दंगल महाराज यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण यासाठी २ लाख ६८ हजार , तांबेपुरा भागात काँक्रिटीकरणासाठी २ लाख रुपये तर संत सखाराम महाराज नगर. यात डांबरीकरण कामासाठी शहरातील न्यु प्लॉट भागातील मंगलमूर्ती पतसंस्था ते सितलनाथ मंदिराच्या कोपऱ्यापर्यंत रस्ता डांबरीकरण ६ लाख ३४ हजार रुपये मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण केले.
पिंपळे रस्ता ८४ कि.मी .१ / ०० ते ३/०० चे मजबुतीकरण व शहरातील नगरपरिषद हद्दितील लक्ष्मीनगर येथे ( गट क्र . ८२५ , गट क्रं १७४ ९- अ ) या खुल्या जागेवर उद्यान विकास कामासाठी ९ लाख ९९ हजार रुपये मंजूर , त्याच पद्धतीने कृषीनगर भागातील ( सव्हें लनं . ९ ०७ / १ अ – ब किंवा गट क्र . १७५३ ) यासाठी ९ लाख ९९ हजार , असे एक न अनेक कामे कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी त्यांच्या आमदारकी काळात केले होते तें ही कोणतेही मंत्रीपद नसताना.