शिरपूर -शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित वाघाडी ता.शिरपूर येथील जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूल मध्ये दिनांक २९ ऑगस्ट , मंगळवार रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन ,ओणम व रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला .
हॉकीचे जादूगर , मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो . ऑलम्पिक मध्ये मेजर ध्यानचंदनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले . त्यांच्या सुवर्ण आठवणींना विनम्र अभिवादन म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ठेवण्यात आला होते. कार्यक्रमाची सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या आदरणीय मेघा मॅडम यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन केले.त्यानंतर खेळाच्या विविध साहित्याचे पूजन करून नारळ फोडण्यात आला. स्वस्थ शरीरासाठी खेळ सुद्धा आवश्यक असतात. खेळांनी शरीराची निकोप वाढ होत असते. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने शाळेत कबड्डीचा सामना ठेवण्यात आला होता.