June 30, 2025 2:24 pm

८ कोटी निधी चा तालुक्यात बाऊ करू पाहणाऱ्याणी हे ही लक्षात घ्याव मा. आमदार शिरीष चौधरी यांनी मंजूर केलेल्या कामावर मंत्री पाटील मारताय डांबर..! मंत्री अनिल पाटील यांच्या वर शिरीष चौधरी यांचा जोरदार टोला..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

८ कोटी निधी चा तालुक्यात बाऊ करू पाहणाऱ्याणी हे ही लक्षात घ्याव मा. आमदार शिरीष चौधरी यांनी मंजूर केलेल्या कामावर मंत्री पाटील मारताय डांबर..!
मंत्री अनिल पाटील यांच्या वर शिरीष दादा चौधरी यांचा जोरदार टोला..

तालुक्याच्या विकासासाठी तुम्हाला जनतेसाठी खरोखर काम करायचे आहे तर दुसरी कामे करा मंजूर. मा. आ. शिरीष दादा चौधरी यांचे मत..

अमळनेर ची जनता संभ्रमात विकास निधीचे श्रेय द्यावे तरी कोणाला??..

अमळनेर : विक्की जाधव..

शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील रस्त्या ची अशी गत झाली की न बोललेलं बर..

असे असताना या परिसरात आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातुन त्रिमिक्स पद्धतीच्या नव्या रस्त्यांची अनमोल भेट अमळनेरकरांना मिळणार या वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत 5 कोटी निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.

या काम साठी वापरला जाणार ३ कोटी निधी.
शहरात हायमास्ट लाईट साठी 3 कोटी निधी मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे सदरचे रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरणासह सोबत दुभाजक व फुटपाथ देखील होणार आहे.

याबाबतचा शासननिर्णय दि 31 जुलै रोजी प्रसिद्ध झाला असून अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून एकूण चार महत्वपूर्ण रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.
यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या वारंवार भेटी घेऊन योग्य तो पाठपुरावा त्यांनी केल्याने शासनाने यापैकी चार रस्त्यांना मंजुरी देऊन 5 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
लवकरच या रस्त्यांची टेंडर प्रोसेस व वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

हे होणार रस्ते.
सदर पाच कोटी निधीतून विजय फरसाण ते विजय शॉपी पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण रस्ते दुभाज फुटपाथ करणे(1 कोटी 50 लक्ष),गीता प्रोव्हिजन ते पाच पावली देवी मंदिरापर्यंत पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण रस्ते दुभाज फुटपाथ करणे(1 कोटी 40 लक्ष),डॉ अंजली चव्हाण यांच्या रुग्णसेवा हॉस्पिटल पासून दुर्गा टी डेपो पर्यंत पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण रस्ते दुभाज फुटपाथ करणे(1 कोटी),स्टेट बँक ते बस स्टॅन्ड पर्यंत पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण रस्ते दुभाज फुटपाथ करणे(1 कोटी 50 लक्ष) आदी रस्त्यांची कामे होणार आहेत.
सदर महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याने व्यापारी बांधव,विक्रेते व नागरिक यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.तर शिरीष चौधरी यांनी अमळनेर जनतेच्या वतीने सदर मंजुरी बद्दल मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना गिरीशभाउ महाजन ,जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.सदरची कामे अतिशय चांगल्या दर्जाची होतील असा विश्वास देखील श्री चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!