तालुक्यातील बाम्हणे गावाच्या पोलीस पाटीलपदी गणेश भामरे यांची निवड झाली आहे.
अमळनेर: विक्की जाधव.
नुकत्याच झालेल्या पोलीस पाटील परीक्षेची अंतिम यादी जाहीर झालेली आहे . त्यात बाम्हणे गावाच्या पोलीस पाटीलपदी गणेश धर्मराज भामरे यांची नियुक्ती झालेली आहे.
गणेश भामरे सध्या बाम्हणे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत . त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे . त्यांचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच बाम्हणे गावातील नागरिकांनीही त्यांचे कौतुक केले आहे . तसेच गणेश भामरे मित्रपरिवार व सर्व स्तरातील सामाजिक , राजकीय व्यक्तींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.