वडगाव निंबाळकर येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचा उदघाटन समारंभ संपन्न…
बारामती ( सह-संपादक – संदिप आढाव)
वंचित बहुजन आघाडी चे वडगाव निंबाळकर येथे शाखा उद्घाटन करण्यात आले. या शाखेचे आयोजन वंचित बहुजन आघाडी चे बारामती तालुका सचिव आर्यन साळवे यांच्या आयोजनाने करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा पुर्वचे अध्यक्ष राज कुमार साहेब तसेच पुणे जिल्हा संपर्क प्रमुख ॲड. वैभव कांबळे, पुणे जिल्हा सहसचिव गोविंद कांबळे, बारामती तालुका अध्यक्ष रामदास जगताप यांच्या हस्ते वडगाव निंबाळकर शाखे च्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार म्हणाले निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्या कधीही लागतील त्यामुळे आपण तयारीत असणं गरजेच आहे येणाऱ्या निडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणुका लढवेल त्यामुळं आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार व पक्ष लोकांच्या घराघरात पोचवा शिवाय गायरणात ज्या लोकांची घरे आहेत त्यांना त्यांची घरे नावावर करून देण्यासाठी मुंबई येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा झाला त्याचवेळेस राहती घराला कोणताही धक्का लागणार नाही असा निर्णय झाला त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही बाळासाहेब आंबेडकर सदैव आपल्या पाठीशी आहेत .
त्यानंतर बारामती तालुका अध्यक्ष रामदास जगताप यांनी नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी शाखा अध्यक्ष असिफ शेख यांनी आपले मनोगत मांडताना माझ्यावर विश्वास ठेऊन मला हे पद दिले मी ह्या पदाचा चांगल्या कामासाठी व लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहील असे संबोधले. या दरम्यान उपस्थितांचा व नवनिर्वाचित शाखा सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख उपस्थितीमध्ये उपाध्यक्ष गणेश जाधव, उपाध्यक्ष जितोबा खरात, बारामती तालुका संघटक गणेश थोरात, संघटक आनंद जाधव व दीपस्तंभ अकॅडमी संस्थापक अध्यक्ष शरीफ शेख हे उपस्थित होते.
यावेळी वडगाव निंबाळकर शाखेचे अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्ष पै.अक्षय जाधव, पै.अमीर बागवान, सचिव पै.विक्रम साळवे, सचिव बंटी सोनवणे, सहसचिव विशाल गायकवाड, महासचिव लखन भिसे, खजिनदार गणेश रांगोळे पाटील, कार्याध्यक्ष धनंजय साळवे, प्रशांत खुडे, संघटक साहिल बागवान, गौरव खुडे, सहसंघटक मयूर अहिवळे, सल्लागार रोहन साळवे, संजय खुडे, संपर्क प्रमुख विशाल साळवे, मार्गदर्शक संतोष गायकवाड, अंकुश खुडे, गणेश खुडे, प्रसिद्ध प्रमुख निहाल साळवे, सौरभ जगताप, सनी साळवे, आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल गायकवाड यांनी मानले .