महाराष्ट्र राज्याचे माजी संसद मंत्री व इंदापूर तालुक्याचे माजी आमदार नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आय कॉलेज इंदापूर येथे मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 25, प्रतिनिधी : डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
विद्येचे माहेरघर असलेल्या इंदापूर तालुक्यातील आय कॉलेज या ठिकाणी नामदार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या आरोग्य विषयाच्या चाचण्यांमध्ये डोळे तपासणी, रक्त तपासणी, क्षयरोग तपासणी, करण्यात आल्या. शिवदीप फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्यावतीने मोफत वंध्यत्व निवारण शिबिर व मार्गदर्शन घेण्यात आले.
या शिबिरामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांच्या तपासण्या करण्यात आल्या व तपासणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना चष्मे वाटप तसेच ज्यांना आवश्यक आहे अशा रुग्णांना औषधेही वाटप करण्यात आली . या कार्यक्रमांमध्ये सुमारे 561 रक्तांच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. आय कॉलेजमध्ये आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराला एखाद्या सोहळ्याचे स्वरूप आले होते. रक्तदात्यांसाठी केळी, चहा , बिस्कीट तसेच गिफ्टची सोय करण्यात आली होती. आय कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच कर्मचारी यांचे माननीय हर्षवर्धन भाऊं विषयी असणारा आदर आणि प्रेम याचे दर्शन या शिबिरामधून पहावयास मिळाले.