June 30, 2025 3:14 am

भिगवण शहरातील अत्याधुनिक डायमंड जिमचे नूतनीकरण उदघाटना सोहळा दिमाखात पार पडला

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण शहरातील अत्याधुनिक डायमंड जिमचे नूतनीकरण उदघाटना सोहळा दिमाखात पार पडला

(निलेश गायकवाड )

तब्बल 12 वर्षपासून भिगवण व परिसरातील नागरिकांना शारीरिक सुदृढतेने सक्षम राहण्यासाठी व व्यायामाची आवड होण्यासाठी नुकताच भिगवन शहरांमधील अत्याधुनिक डायमंड जिमचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा पार पडला.

पै. अमोल गायकवाड व राहुल गायकवाड या दोन्ही सख्या भावांनी भिगवण परिसरात छोटेसे रोपटे रोवण्याचा प्रयत्न 12 वर्ष्यापुर्वी केला होता आता त्याचे रूपांतर मोठ्या महाकाय वलयात झालेले पाहवयास मिळत आहे. जिमचे खास वैशिष्ट्य म्हणजे माहिलांसाठी ग्रामीण भागात जिमची आवड व्हावी यासाठी विशेष काळजी घेतली आहे. अत्याधुनिक यंत्र सामग्री पाहवयास मिळत आहे.अनुभवी प्रशिक्षक महिला व पुरुष योग्य मार्गदर्शन अशी नानाविवी विशिष्ट पूर्ण गोष्टी.

जिमचे उदघाटन आपलें आईवडील यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रम दि.24 ऑगस्ट रोजी पार पडला. कार्यक्रम प्रसंगी गोल्ड मेडलिस्ट वर्ल्ड चॅम्पियन महेंद्र चव्हाण , उपयुक्त राज्य कर महाराष्ट्र राज्य संभाजी यादव, सरपंच हिंगणी बेर्डे काळेवाडी ग्रामपंचायत सौ मनीषा यादव , कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर चे अप्पासाहेब जगदाळे तसेच भिगवन व परिसरातील शेकडोच्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता.

गायकवाड परिवाराच्या या नावीन्यपूर्ण अत्याधुनिक जिमच्या उद्घाटन सोहळ्यामुळे भिगवन च्या वैभववात भर पडली आहे असे म्हणावे लागेल…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!