उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी प्रथमच बालेकिल्ल्यात येणार अजितदादा; जंगी स्वागताची तयारी
(निलेश गायकवाड )
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. राष्ट्रवादी पक्षात बंड करुन अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली व एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून सहभागी झाले. या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार हे प्रथमच बारामती येत आहेत.
या दौऱ्यामध्ये बारामतीकरांकडून नागरी सत्कार होत असल्यामुळे या नागरी सत्काराला उत्तर देताना अजित पवार आपल्या मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतात.. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.