पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भर रस्त्यात हल्ला ….
जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.
अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर स्थानिक पत्रकार महाजन यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. तसेच मला काहीही झाल्यास त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील व त्यांचे सहकारी असतील असं सुद्धा म्हटलं होतं.
दरम्यान, आज (गुरूवारी) सकाळी याच स्थानिक पत्रकाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनीच मला मारहाण केली, असा आरोप संबंधित मारहाण झालेल्या स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यापुढेही माझ्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी आता तरी संरक्षण द्यावं, असं पत्रकार महाजन म्हणाले.
तसेच रोहित पवार, आमदार यांनी या प्रकरणाबाबत ट्विट करत या झालेल्या प्रकारबद्दल सरकारला जाब विचारणा केली आहे …..
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले… pic.twitter.com/cjMxWbT1y3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2023