शिव आरोग्य सेनेच्या इंदापूर तालुका समन्वयक पदी अनिल कायगुडे यांची नियुक्ती
(निलेश गायकवाड )
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने “शिव आरोग्य सेना” या विभागाची सुरुवात करण्यात आली आहे.
शिवसेना या मुळ पक्षाच्या मुलभूत विचारधारेनुसार देशसेवा करत असतानाच सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचे काम अविरतपणे मिळावे या हेतूने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून नियुक्ती करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या शिव आरोग्य सेना समन्वयक पदी मदनवाडी येथील श्री अनिल कायगुडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. अनिल कायगुडे यांनी यापूर्वी देखील विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम केल्याचे आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव शिव आरोग्य सेना यासाठी ते पुढील काळामध्ये देखील सर्वसामान्य व तळागाळातील लोकांपर्यंत अडीअडचणी सोडवण्यासाठी करणार असल्याचे बोलताना त्यांनी सांगितले.
सदर नियुक्ती डॉ. सौ शोभा राऊळ प्रदेशाध्यक्ष शिव आरोग्य सेना यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री किशोर ठाणेकर कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते सदर नियुक्तीपत्र देण्यात आले.