प्रताप महाविलयात नवीन मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानास सुरुवात.
अमळनेर: विक्की जाधव.
भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासन मा. जिल्हाधिकारी जळगाव, मा. प्रांताधिकारी, मा.तहसीलदार अंमळनेर यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तसेच
प्रताप महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ ए. बी. जैन, उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी, अंमळनेर भागचे प्रांताधिकारी मा. श्री. महादेव खेडकर आणी मा. तहसीलदार मा. सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने आज प्रताप महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती अभियानास सुरुवात झाली. उपप्राचार्य प्रा. डॉ. विजय मांटे, प्रमुख अतिथी म्हणून अंमळनेरचे नायब तहसीलदार मा. आर. एस. जोशी, सहाय्यक निवडणूक अधिकारी मा. नितीन ढोकणे , प्रा. डॉ. धिरज वैष्णव, प्रा डॉ. धनंजय चौधरी, प्रा. डॉ. हेमंत. पवार, प्रा. सूर्यवंशी सर, प्रसाद शर्मा व इतर अधिकारी तसेंच अनेक बी. एल. ओ, प्रताप सायबर चे संचालक राकेश भाऊ व कर्मचारी, इ. मान्यवर आणी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील, रा. से. यो, एन. सी. सी, क्रीडा, सामान्य ज्ञान, व विविध विभागातील विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांनी केले. नायब तहसीलदार मा. जोशी साहेब यांनी विद्यार्थ्यांना या अभियानाबाबत माहिती देताना निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाचे धोरण, नोंदणी बाबतच्या विविध अटी, नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे या बाबत सविस्तर आणी महत्वपूर्ण अशी माहिती दिली व विद्यार्थ्यांना या अभियानाचे प्रचार प्रसाराचे आवाहन केले. नवीन मतदार नोंदणी करताना मतदाराचे 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे वय पूर्ण असले पाहिजे आणी हे आभियान या महिन्यात पुढे सतत इतर सर्व ठिकाणी सुरु राहील असे ही नमूद केले. आपल्या गावातील बी. एल. ओ., ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका वार्ड निहाय बी. एल. ओ, तहसील कार्यालय इ. ठिकाणी नवीन नाव नोंदणी व नाव दुरुस्ती सुरु असेल. अनेक विद्यार्थ्यांनी अभियानात नाव नोंदणी करून घेतली. मा. डॉ धिरज वैष्णव सर यांनी शासन आपल्यादारीं आले असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात मा. डॉ. विजय मांटे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही चे बळकटीसाठी जनजागृतीचे आवाहन केले. आभार महसूल सहायक अधिकारी श्री नितीन ढोकणे यांनी मानले. तहसील विभाग तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.