June 30, 2025 5:46 am

तांदुळवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ….

अपनी भाषा में पढ़े! Translate

तांदुळवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ….
माढा / अजिनाथ कनिचे
दि. ०१
सालाबाद प्रमाणे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर तांदुळवाडी येथे करण्यात आले होते.यावेळी प्रथम जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानंतर तांदुळवाडी गावचे सरपंच रणजितसिंह पाटील व मान्यवराच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच रणजितसिंह पाटील, शांतीलाल गवळी, गणेश परबत, मिथुन कदम ,राजाभाऊ शिंदे आजिनाथ बापू परबत, अक्षय परबत,संभाजी गवळी इत्यादींनी मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र , व्यसन मुक्ती,शिक्षणाचे महत्त्व इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. मिथुन कदम यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी नागनाथ जाधव ,तानाजी कदम, अप्पा गवळी, नागनाथ कदम, संदीप शिंदे,शिद्धेश्वर कदम, सोमनाथ गायकवाड, डेव्हिड कदम ,अशोक कदम, महेश कदम, जयपाल कदम ,संदीप कदम, साहिल कदम ,नितीन कदम ,शरद कदम, अभिजीत कदम, बाळासाहेब कदम, बळी काळे, सुरेश जाधव, शाहू कदम इत्यादी समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,

तसेच तांदुळवाडी ग्रामपंचायत मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच रणजितसिंह पाटील, उपसरपंच किरण गवळी ,ग्रामसेवक रमाकांत केवटे भाऊसाहेब, इतर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जि. प.आ.शाळा तांदुळवाडी येथेही लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक वासकर सर, खटाळ सर, जाधव सर, कुंभार सर, राक्षे मॅडम ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट, इतर सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

नवदिशा सार्वजनिक वाचनालय तांदुळवाडी येथेही लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगेश तुकाराम भोसले, विठ्ठल यादव ,रमेश माने ,बाबा ताकभाते,दत्तू परबत, आबासाहेब परबत आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!