June 29, 2025 11:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी साधणाऱ्या सुसंवादाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ : भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी साधणाऱ्या सुसंवादाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ : भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी

शिरपूर : “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रच्या” माध्यमातून शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे. या योजनेचे उदघाटन दि. २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी ८.५ करोड पीएम किसान लाभार्थी यांना १४ व्या हप्त्याचे हस्तांतरण होणार असून यावेळी दि. २७ जुलैला सकाळी ११ वाजता ते शेतकर्‍यांशी सुसवांद साधणार आहे. असे धुळे ग्रामिण भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्राक म्हटले आहे. पुढे म्हटले आहे की, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://pmevents.ncog.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे किंवा https://pmindiawebcast.nic.in या लिंक वर जावून ऑनलाईन कार्यक्रम सुध्दा बघू शकतील. तसेच सदरील कार्यक्रम जवळील कृषी केंद्रावर लावलेल्या टीव्हीवर सुद्धा शेतकरी बघू शकणार आहे. संबंधित कार्यक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी गावातील भाजपा मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांच्याशी शेतकरी संपर्क साधू शकतात. सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन धुळे ग्रामिण भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!