June 29, 2025 11:17 am

सौ. दीपाली सुशिल पवार यांना सेवामुक्त केले.! मिंधेगटाला जोरदार झटका !!

अपनी भाषा में पढ़े! Translate

मिंधे गटात डेरेदाखल झालेले युवा सेनेचे नेते सुशिल पवार यांची पत्नी २०१३ पासून महपालिकेच्या आरोग्य विभागात बोगस सफाई कामगार म्हणून सेवेत होती. आपल्या राजकिय वलयाचा वापर करून सुशिल पवार या उद्योगपती असलेल्या पतीने आपल्या पत्नीची महापालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून वर्णी लावली होती.ती २०१३ ते २०२२ डिसेंबर अखेर पर्यंत प्रत्यक्ष काम न करता दरमहा सुमारे ३० हजाराचा पगार लाटत होती. ही नोकरी मिळवण्यासाठी तिने आपल्या पतीच्या सहाय्याने प्रकाश चौहाण या मेहतर समाजाच्या सफाई कामगाराची मानलेली मावस बहिण असल्याचा खोटा वारस दाखला मिळवला होता.जिथे पतीची जात पत्नीला लागु शकत नाही तिथे यांनी एका अनोळखी व्यक्तिची मावस बहिण असल्याचा बनाव करून महापालिकेची सफाई कामगाराची नोकरी लाटून एका गरीब व गरजू मेहतर वा वाल्मिकी समाजाच्या महिलेचा रोजगार हिरावला होता.

वास्तविक लाड-पागे समितीच्या शिफारसी नुसार केेवळ मेहतर व वाल्मिकी समाजातील व्यक्तिंच्या वारसांनाच सफाई कामगार म्हणुन नोकरी मिळू शकते.परंतू या योजनेचा गैरलाभ घेत सुशिल पवार या हाॅटेल,सलून व चाईल्ड हाॅस्पिटलचा मालक असूनही हरामाची कमाई मिळविण्यासाठी पत्नीस सफाई कामगार बनवून ९ वर्षे महापालिकेच्या तिजोरीची लूट करीत होता. ही बाब लक्षात येताच अन्याय विरोधी संघर्ष समितीचे सदस्य व पत्रकार सिद्धांत गाडे यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये लेखी तक्रार केली होती. मात्र प्रशासन त्याची दखल घेत नव्हते. दरम्यान सुशिल पवार हा शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सामिल झाला. या नंतर मात्र गद्दारांना क्षमा नाही हा दिघेसाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून मी या प्रकरणात लक्ष घातले व पाठपुरावा सुरू केला.त्या बरोबर दीपाली पवार यांची हजेरी लावणे बंद झाले व त्या ३१ डिसेंबर २२ नंतर गैरहजर राहू लागल्याचे दर्शवण्यात आले. वास्तविक काम न करता वेतन घेतल्याने ९ वर्षाच्या वेतनाची वसुली होणे क्रमप्राप्त होते.परंतू महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बदमाश अधिका-यांनी दीपाली पवारच्या सह्या जुन्या रेकॉर्डवर घेऊन ती हजर असल्याचा बनाव रचला व खोटेे रेकॉर्ड तयार केले. ज्या महिलेने कुठे काम केले ? तिचे वरिष्ठ कोण होते ? वॉर्ड ऑफिस कुठे आहे ? हजेरी शेड कुठे आहेत ? हे सांगता येत नाही तिला सफाई कामगार असल्याचा पुरावा तयार करून त्या हरामखोर अधिका-यांनी विष्ठा खाल्ली. माझ्या पाठपुराव्याच्या तगाद्यामुळे प्रचंड राजकिय दबाव असूनही अखेर आज आयुक्तांनी दीपाली पवार यांची नकली सेवा समाप्त केल्याचा आदेश जारी केला. दीपाली पवार
यांच्याबद्धल माझ्या मनात आत्मियता आहे. वास्तविक बनावट वारसा दाखला सादर करून फसवणुकीने नियुक्ती मिळवली यासाठी महापालिकेने फसवणुकीचा फौजदारी गुन्हा नोंदवणे आवश्यक होते.तसेच काम न करता वेतन घेतले म्हणुन ९ वर्षाचे वेतन वसुल करावयास हवे होते. परंतू आयुक्तांनी फक्त सेवा समाप्ती करून वेळ मारून नेली.

वास्तविक सुशिल पवार हा मला सुपरिचित आहे.त्याच्या पत्नीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन अटक व्हावी, अशी मी अपेक्षा बाळगत नाही व तशी मागणीही करू इच्छित नाही. इतके औदार्य व माणुसकी माझ्यात आहे. दीपाली पवार हीस तिच्या पतीच्या चुकिची शिक्षा भोगावी लागू नये, असे मला वाटते.जी शिक्षा व नाचक्की झाली त्यास फुकटखाऊ सुशिल पवारच जबाबदार आहे. सुशिल पवारच्या या मुर्खपणाचा फटका प्रकाश चौव्हाणच्या वारसांना बसणार आहे.त्यांना कायमस्वरूपी नोकरीच्या हक्काला मुकावे लागले आहे. दीपाली सुशिल पवारही कायमस्वरूपी सेवामुक्त झाल्याने महापालिकेची लूट थांबवण्यात मला यश आलेच तसेच तिला सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत, फंड ग्रॅच्युइटी सरकार जमा होईल. त्याच बरोबर मिंधेगटाच्या गद्दार युवा नेत्याला अद्दल घडवण्यात मी यशस्वी झालो,याचा मला सार्थ अभिमान आहे.

– दिलीप मालवणकर

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!