June 30, 2025 11:41 pm

प्रशांत बंब, जयंत पाटील यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक निधी इंदापूर चे दत्तात्रय भरणे यांना 436 कोटी निधीचा वर्षाव

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रशांत बंब, जयंत पाटील यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक निधी इंदापूर चे दत्तात्रय भरणे यांना 436 कोटी निधीचा वर्षाव

(कुणाला किती मिळाला निधी? यादी आली समोर…)

(निलेश गायकवाड )

 

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर कुणाला किती निधी मिळाला यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यातच अधिवेशनाच्या १५ दिवस आधी आलेल्या नेत्यांना अर्थमंत्री अजित पवार यांनी भरघोस निधी दिलेला आहे. इतकंच नाही तर अजित पवार गटात न आलेल्या पण शरद पवार यांच्या बरोरब असलेल्या नेत्यांना भरघोस निधी मिळाला आहे.

यंदाच्या अधिवेशनात सर्वाधिक निधी हा भाजप आमदार प्रशांत बंब यांना सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. बंब यांना ७४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांना ५८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणारे इंदापूर तालुक्याचे आमदार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वाधिक निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी 436 कोटी आपल्या तालुक्यासाठी मंजूर केला आहे.यासोबतच तर माजी मंत्री राजेश टोपे यांना २९३ कोटी आणि आमदार रोहीत पवार २१० कोटी निधी देण्यात आला आहे.

कोणत्या आमदाराला किती मिळाला निधी?

प्रशांत बब गंगापूर : ७४२ कोटी

जयंत पाटील इस्लामपूर, वाळवा : ५८० कोटी

दत्तात्रय भरणे इंदापूर : ४३६ कोटी

राजेश टोपे, घनसावंगी : २९३ कोटी

मकरंद अबा पाटील , वाई : २९१ कोटी

रोहीत पवार कर्जत जामखेड : २१० कोटी

भरत गोगावले, महाड : १३४ कोटी

उदय सिंह राजपूत (ठाकरे गट) कन्नड : १२४ कोटी

किरण लहमाते, अकोले (अहमदनगर) : ११६ कोटी

दिलीप वळसे पाटील, आंबेगाव : ९६ कोटी

अजित पवार, बारामती : ७३ कोटी

विनोद निकोले, डहाणू : ७६ कोटी

अब्दुल सत्तार, सिल्लोड : ५८ कोटी

महेंद्र दळवी (शिंदे) अलिबाग : ४५ कोटी

महेंद्र थोरवे, (शिंदे) कर्जत : ४८ कोटी

अदिती तटकरे, श्रीवर्धन : ४० कोटी

संदीप क्षीरसागर, बीड : ३५ कोटी

माणिकराव कोकाटे, सिन्नर : ३३ कोटी

छगन भुजबळ, येवला : ३१ कोटी

संदीपन भूम्रे, पैठण : २९ कोटी

महेश बाल्डी (भाजप), उरण : २८ कोटी

प्रकाश साळुंखे (अजित पवार), गेवराई : १३ कोटी

हसन मुश्रीफ, कागल : २२ कोटी

धनंजय मुंडे, परळी : २१ कोटी

संतोष बांगर , कलमनुरी : १९ कोटी

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!