शिरपूर तालुक्यातील हाडाखेड आर.टी.ओ.चेक पोस्ट (सिमा तपासणी नाका) येथे वाहन चालकांकडुन आर.टी.ओ.च्या खाजगी पन्टर मार्फत होत असलेल्या बेकायदेशिर पैशांची वसुली थांबवणेसाठी व आर.टी.ओ. कोणत्या कायदयाने वाहन चालका कडुन पन्टर मार्फत पैसे वसुली करतात, तसेच त्याचेमागे नेमक्या कोणत्या शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांची फुस व साथ आहे सविस्तर चौकशी होवुन संबंधीतावर कायदेशिर कारवाई होणे बाबत..
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करणे बाबत मागिल काही दिवसा पूर्वी आदेश पास करुनही बेकायदेशिर रित्या व शासनाचा आदेश धाब्यावर बसवुन त्याची अंमलबजावणी न करता, हाडाखेड चेक पोस्ट आर.टी.ओ. नाक्यावर संबंधीत आर. टी. ओ. हे खाजगी पन्टर मार्फत राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वरुन येत जात असणाऱ्या मालट्रक, कन्टेनर, आयशर, वगैरे वाहनांकडुन बेकायदेशिर पैशांची वसुली केली जात आहे व वाहन चालक हे आर.टी.ओ. कॅबिनमध्ये जावुन, पन्टर लोकांना तसेच
आर.टी.ओ.लोकांना पैसे दिले जात आहे त्याबाबत बरेच वेळा अर्ज देवून, निवेदन देवून, व वेळोवेळी शहानिशा करुनही बंद होत नाही. त्यामुळे वाहन चालक हे त्रस्त झाले आहेत व त्या बाबत आम्हास वाहन चालकांच्या तक्रारी येत असतात. सदर ठिकाणी पैसे घेतले जात असल्या बाबतचे व्हीडीओ क्लीप देखील आमचेकडे उपलब्ध आहे.
हाडाखेड सीमा तपासणी नाका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा नाका असुन मध्य प्रदेशातुन येणाऱ्या म्हशींच्या गाडयांची व बकन्यांचे गाडींची यांची सर्रास वाहतुक होते व त्यांचेकडुन 700/-रुपये पर वाहनाकडुन मागणी होत असते व वसुली होते. तसेच महामार्गावरुन लोडींग मालट्रकांकडुन तसेच इतर वाहनाकडुन बेकायदेशिर पैशांची सर्रास लुट होत आहे. त्या मागे नेमक्या कोणत्या शासकीय अधिकाऱ्याची साथ व फुस असुन पडदया आड नेमके कोणतेही आर. टी. ओ. अधिकारी तसेच इतर अधिकारी आहेत या बाबत सविस्तर चौकशी व्हावी व महामार्गावर अवजड वाहनांची देखील (ओव्हरलोड) १२ टायर ५०० रुपये, १४ टायर-७००/- रुपये १६ टायर, ९००/- रुपये १८ टायर-११००/- रुपये तर मोठ मोठे कन्टेंनर पास होण्यासाठी २०००-२०००/- हजार रुपये दिले जावून वाहने सोडले जात असतात. महाराष्ट्रात अशी अनेक सीमा तपाससणी नाके असुन त्यातून भरमसाठ बेकायदेशिर पैसा वसुल केला जात आहे. त्यामुळे आर.टी.ओ. चेक पोस्ट वरील अधिकारी, (आर.टी.ओ.) तसेच इतर शासकीय अधिकारी हे घड होत असुन जनतेची अडवणुक करुन पिळवणुक करीत आहेत. तरी या मागील अधिकारी यांची चौकशी कावी व संबंधीत आर.टी.ओ. ऑफिस ला तसेच कॅबीन मध्ये तसेच कॅबिनचे बाहेर सी.सी.टी.व्ही.चे कॅमेरे देखील त्वरीत बसवणीत यावे त्यासाठी देखील मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
मौजे शिरपूर ता. शिरपूर हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील हाडाखेड ता. शिरपूर आर.टी.ओ.चेक पोस्ट (सिमा तपासणी नाका) येथे वाहन चालकांकडुन आर.टी.ओ.च्या खाजगी पन्टर मार्फत होत असलेल्या बेकायदेशिर पैशांची वसुली त्वरीत थांबवावी व आर.टी.ओ. कोणत्या कायदयाने वाहन चालकाकडुन पन्टर मार्फत पैसे वसुली करतात, तसेच त्याचे मागे कोणत्या अधिकाऱ्याची फुस व साथ आहे त्याची त्वरीत खाते निहाय चौकशी व्हावी अन्यथा सदर प्रकरणास वाचा फोडुन लवकरात लवकर मनसे पध्दतीने आंदोलन छेडण्यात येईल व होणारे परिणामास प्रादेशिक कार्यालय व शासन जबाबदार राहील. संजय पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, नक्षत्र पाटील धुळे जिल्हा संघटक, तालुका अध्यक्ष शुभम गवळी, शहराध्यक्ष अतुल सोनार, शिरपूर शहर उपाध्यक्ष राहुल पाटील, हिमांशू सूर्यवंशी, मयूर येशी ,विजय पवार आदी उपस्थित होते.