अमळनेर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना गटातर्फे भाजपनेते किरीट सोमय्या
यांच्या अश्लील कृत्याचा निषेध.
विक्की जाधव अमळनेर..
करून अमळनेर येथे त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौकात
हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्या
यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन सोम्मया
यांच्या कृत्याची निपक्षपाणे चौकशी करून
गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी
करण्यात आली. आंदोलनावेळी ऊ. बा. ठा. गटाचे उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील,
उपजिल्हा समन्वयक विजय पाटील, नरेंद्र ठाकरे, तालुका संघटक संगीता शिंदे,
उपजिल्हा संघटक मनीषा परब, देवेंद्र देशमुख, उषा परब, वैशाली वारंग, उज्वला कदम,
ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब पाटील, आदी पदाधिकारी आणि
कार्यकर्ते उपस्थित होते.