भारती सोपान शिंदे सर्वसामान्य परिस्थितीशी भांडणारे हे कुटुंब उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजे गावे गावी कपडे विकणे तेव्हा कसरतीच्या या जगण्यात उजेड पेरण्यासाठी कोमल वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेली लेक स्पर्धा परीक्षेला सामोरे गेली आणि दुसऱ्याच प्रयत्नात तिने फौजदारपदाची परीक्षा उत्तीर्ण केली.
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तेव्हा वडील सोपान शिंदे यांचा आनंद गगनात मावेना, तसेच
समाजातील शुभचिंतक असलेले त्यांचे सहकारी संतोष भाऊ बोरसे पिंपरी खुर्द त्यांनी बोलवून तिचा सत्कार केला. आणि शाबासकीची थाप दिली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक प्रतिनिधी आणि मित्रपरिवार सर्व उपस्थित होते.
बी.कॉम. केल्यावर . २०१९ मध्ये
पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा दिली.
मात्र अपयश आले. पण तिच्यातली जिद्द हरली नाही. आणी कोमल खचली नाही तिने पुन्हा दुसऱ्यांदा प्रयत्न केला. परीक्षा दिली. वाट सुकर होईल, हा विश्वास तिच्या मनात होता.
निकाल लागला. तेव्हा कोमलने 550 पैकी 339 गुण मिळवित ही परीक्षा उत्तीर्ण केली
आणि पी एस आय पदासाठी पात्र ठरली. जैन इरिगेशनमध्ये कामाला असणारी आई भारती
देऊळ दुमदुमून यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघालेच हे तिच्या कष्टाचे फळ होते हे तेव्हाडेच खरे”” कोमलला आनंदकुशीत घेत तिच्या जिद्दीचे कौतुकही केले. आता कोमल..
‘खाकीत दिसणार आहे. कोमलता विसरून, कायद्याची कठोरता पांघरून कोमलला आता सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा मंत्र म्हणतच प्रत्येक पाऊल टाकावे लागणार आहे.
कोमल म्हणते,
आईवडिलांनी रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं हे चीझ आहे, आणि तेच माझ्या डोळ्यासमोर होत.
त्यांचे श्रम आणि कामाप्रति असलेली निष्ठा, जिद्द पाहून नक्कीच प्रेरणा मिळायची, म्हणून मीही अभ्यासासाठी
जीव ओतला. त्यात यश मिळाले.
माझे वडील गावोगावी कपडे विक्रीचा व्यवसाय करतात आता त्यांना लोक पी एस आय चे वडील म्हणून ओळखतात. आईवडिलांची स्वप्नपूर्ती केली. यापेक्षा माझ्यासाठी दुसरा आनंद कोणताच नाही.