दोन वेळा भूमिपूजन करून देखील ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मदनवाडी रस्त्याचे काम राहिले अर्धवट;तेजस देवकाते
(निलेश गायकवाड)
मदनवाडी ते पोंधवडी या रस्त्याचे दोन वेळा भूमिपूजन होऊनही संबंधित रस्त्याचे काम मदनवाडी गावामध्ये अपूर्ण राहिलेले दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे इंदापूर तालुका अध्यक्ष तेजस देवकाते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे अपूर्ण काम संबंधित ठेकेदाराकडून काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सांगितले.
इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सदर कामाचे भूमिपूजन झाले होते. भरणे यांनी ठेकेदाराना लवकरात लवकर काम करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. सदर सूचना देऊन देखील ठेकेदाराने अर्धवट व निकृष्ट काम केल्याचे दिसत असल्याने भरणे यांनी केलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली असे म्हणावे लागेल. नागरिकांना या अर्धवट कामामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठेकेदाराने केलेले निकृष्ट दर्जाची कामाची चौकशी होऊन अर्धवट काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा तेजस देवकाते यांनी निवेदनाद्वारे दिला.