प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उद्यानाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिला आहे . सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या शहरातील एकमेव उद्यानाची दुरावस्था झालेली आहे .त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे .शहरातील मुलांना खेळण्यासाठी कुठेही उद्यान उपलब्ध नाही .ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विरंगुळा केंद्र नाही . नगरपालिकेचे एकमेव असलेल्या उद्यानाची ही अतिशय वाईट अवस्था झालेली आहे .या उद्यानाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे . नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांना निवेदनाद्वारे ताबडतोब दुरुस्ती करण्याबाबत विनंती केली आहे .
अन्यथा महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानात 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता निषेध सभा घेण्यात येईल व त्यानंतर त्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल .कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असा इशाराही दौंड नगरपालिकेला देण्यात आलेला आहे .