गाय महींशींची कत्तली करीता अवैद्य वाहतूक करणारे दोन आरोपींना पारोळा पोलिसांनी केली अटक ….
प्रतिनिधी मयुर पाटील
पारोळा- गाय महींशींची कत्तली करीता अवैद्य वाहतूक करणारे दोन आरोपींना केली अटक व जनावरे केली गोशाळेत केली पारोळा पोलिसांनी केली जमा –
पारोळा ते विचखेडा दरम्यान छोटा हत्ती क्र MH 19 S 4438 मधून एक मैस,गाय,W वासरु असे कत्तलिकरिता धुळे कडे प्राण्यांची वाहतूक होत आहे अशी बातमी बातमीदाराकडून मिळालेने नमूद टाटा कंपनीचे छोटा हत्ती मध्ये मैसं, गाय w वासरु मिळून आले असेच चालक संजय जगन भराडी वय 32 वर्ष र महींदले ,गोकुळ नारायण भिल वय 35वर्ष महिंडले यांना ताब्यात घेऊन अटक केली तसेच वरील वर्णन चे प्राणी ताब्यात घेऊन आर सी बाफना कुसुंबा गोशाळा येथे सुरक्षिततेचे दृष्टीने जमा केले आहे तसेच वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे, नमूद प्राणी कत्तली करीता क्रूरतेने डांबून,पाणी चारा याची सुविधा न देता किंवा नियमांचे पालन न करता, आढळून आले नमुदची कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना संदीप सातपुते,पो को आशिष गायकवाड,पो को किशोर भोई,पो कॉ राहुल पाटील,पो कॉ भूषण पाटील,पो कॉ नरेंद्र पाटील,होमगार्ड चेतन पाटील यांनी केलेली आहे.