June 30, 2025 7:42 am

नीरा नरसिंहपूर परिसरात पावसाचा लपंडाव.

अपनी भाषा में पढ़े! Translate

नीरा नरसिंहपूर परिसरात पावसाचा लपंडाव.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 17 प्रतिनिधी- डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
निरा नरसिंहपुर परिसरामध्ये पावसाचा लपंडाव चालू आहे. साधारणतः सहा जून च्या नंतर पाऊस चालू होतो आणि शेतकरी लोक आपापल्या शेतामध्ये उसाच्या लागणी करत असतात परंतु आत्ता फक्त आणि फक्त आभाळच येत आहे आणि कुठे कुठे थोडा थोडा अत्यल्प प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी हा चिंतेत आहे आणि देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की पाऊस भरपूर प्रमाणात पडू दे आणि आमचे पिके जोमाने येऊ दे.
पाऊस जर भरपूर प्रमाणात पडला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, बांधकाम व्यवसायाचा प्रश्न, तसेच उद्योग धंद्याचा प्रश्न असे बरेचसे प्रश्न सुटतात. त्याच्यामुळे सर्व क्षेत्रातील लोक हे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि देवाकडे लवकर पाऊस पडू दे म्हणून साकडे घालत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!