कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण..
कर्मयोगी फाऊंडेशन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवित आहे. दरवर्षीप्रमाणे याविवर्षी त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेत कर्मयोगी फाऊंडेशन, गायत्री परिवार, तरुण मित्र परिवार कानोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जुलै २०२३ रोज रविवारला कानोली ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथे वृक्षागंगा अभियाना अंतर्गत तरु मित्र तरु पुत्र या शीर्षकाखाली गायत्री यज्ञ करून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. विशेषतः आंबा, चिकू, पेरू, जांभुळ, आवळा ही फळझाडे लावण्यात आली तर काही प्रमाणात वड, पिंपळ व कडुलिंबाची झाडे लावण्यात आली. तसेच या झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी सर्व झाडांना कठडे लावण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री परिवार, कर्मयोगी फाऊंडेशन, कानोली मित्र परिवार व गाककरी मंडळीनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली..