June 29, 2025 2:40 pm

पॅंटच्या खिशात सापडलेले पैसे केले परत – सावरे बंधूचे मानले आभार..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पॅंटच्या खिशात सापडलेले पैसे केले परत – सावरे बंधूचे मानले आभार..

करमाळा : अर्जुननगर (ता.करमाळा) येथील चत्रभुज नारायण घाडगे
यांनी आपले कपडे करमाळा शहरातील सावरे बंधू यांचे ‘गजराज ड्रायक्लीनर्स’ मध्ये ड्रायक्लिनला टाकले होते, यात श्री.घाडगे यांच्यापॅंटच्या खिशामध्ये चुकून 8382/- ही रक्कम तशीच पॅंटमध्ये आली होती.

यानंतर ‘गजराज ड्रायक्लीनर्’चे मालक सुधीर सावरे व संदीप सावरे यांच्या निदर्शनात आले, त्यानंतर त्यांनी वडिलांना फोन लावून या गोष्टीची कल्पना दिली, त्यानंतर वडिलांनी श्री.घाडगे यांच्याशी संपर्क करून त्यांची रक्कम परत द्या असे सांगितले.

त्यानंतर श्री.घाडगे यांना संपर्क करून या घटनेची कल्पना दिली व दुकानांमध्ये बोलून घेउन त्यांना ही रक्कम परत देण्यात आली. यानंतर श्री.घाडगे यांनी सावरे बंधूचे आभार व्यक्त केले. तसेच हि हकीकत समजल्यानंतर अनेकांनी सावरे यांचे कौतुक केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!