June 29, 2025 7:36 pm

मोठी बातमी अजित पवारांसह मंत्री अनिल पाटील यांना मिळाले हे खाते..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी शरद पवारांना
धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह
उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात
उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यावर त्यांच्यासोबत
राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ
घ्यायला १० दिवस उलटल्यावर आज खाते वाटप
झाले असून यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला
आहे.

विक्की जाधव. 9175050300

यात अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्याकडे वित्त व नियोजन खाते, छगन भुजबळ
यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण
मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते
देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे
महसूल, पशू संवर्धन खाते देण्यात आले आहे. धनंजय
मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय
शिक्षण मंत्रालयाच्या जबाबदारी देण्यात आले आहे.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते
कायम ठेवण्यात आले असुन
शंभूराज देसाई राज्य उत्पादन शुल्क
आदिती तटकरे महिला आणि बाल विकास
संजय बनसोड खेड आणि युवा कल्याण बांद्रे,

मंगल प्रभात लोढा कौशल्य रोजगार औद्योगिक आणि नवाचार

अनिल पाटील राहत पुनर्वसन आणि आपदा प्रबंधन
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या
खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये
देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल
रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप
जाहीर करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!