June 29, 2025 10:57 am

हितगुज

अपनी भाषा में पढ़े! Translate

हितगुज
अनिता सूर्यभान शिंदे (खरात)

😎 आज ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा पहायला गेलो…सगळ्या मैत्रिणीं सोबत… धम्माल आली, वाटले नवरोबाला घेऊन पुन्हा यावे पाहायला 😁पूर्ण हॉल फक्त बायकाचं..😅
मनामध्ये विचार आला की हा फॅमिली सोबत असते ना तर त्यांना म्हणजे पुरुषांना स्त्री जरासा समजली असती..हो की नाही?
मस्त मांडणी केली आहे…सिनेमा अगदीच सोज्वळ वाटला…काही क्षण आपणच आहोत त्या ठिकाणी ही सुद्धा जाणीव झाली..कधी खळखळुन हास्य 😂 अन टचकन डोळ्यांत पाणी देखील आले 🥹

सगळ झाले खरे पण खरं सांगु सगळ्या संसारिक बायकांना एकत्र जमवायलाच खूप कठीण जाते बरं का?.😥
प्रत्येकीची निरनिराळी परिस्थिती असते ! ती सहज ढकलून नाही ना पुढे जाता येत..🙃
कोणाचा जॉब तर कोणाच्या मुलांची शाळा..😟
कोणाचे नवरोबा निघाले सिनेमा पहायला म्हणून नाराज😒
तर
कोणाची सासू मोक्कार पैसे उडवतात बायका म्हणून बोचरे बोल बोलत रिकामी..☹️
कोणाचे वेळेचे नियम..तर कोणाची कपड्यांवर बंधन…😔
कोणी सहज बोलून मोकळे’बघा निघाल्या पीच्चरला 😏नट्टापट्टा करून 🤪तर कोणी कामधंदा नसणाऱ्या कामे आहेत ही कुजबुज करून मोकळे. 😠

अरे किती बोलता रे.. बस झालं ना! 🙁
एक दिवस नाही का जगू शकत ती मनसोक्त…😞
सिनेमाला जायचेय म्हणुन तिची सकाळची काम आटोपण्याची लगभग..स्वयंपाक,भांडी,कपडे,देवपूजा,फरशी 😰सगळे तर जिथल्या तिथे करून मग ती स्वतःला वेळ देते ना 🥺
मग तरी देखील ती सगळे बोलणे, सगळी परिस्थीती संभाळून वरिष्ठांकडून कडून बोलणी खाऊन ती केस मागे घेत घाम पुसत 😥 दम टाकीत येते…चला झालं आवरून माझं 🥰 आणि
पिच्चर संपल्यावर लगेचच निघूयात बरं,! म्हणून निघायची देखील घाई..
गाडीत बसून पण तिचं सार ध्यान घरीच बरं का!😍
काही राहिलय का?🤔 गँस व्यवस्थित बंद केलाय ना?😐 कपडे पावसात भिजणार तर नाहीत ना ? पैसे पुरतील का?😜
आल्यावर कोणाकोणाला कसं तोंड द्यायचं..?😇
या वेग वगळ्या विचारांत गूरफटलेली..😟 तरीदेखील ती आनंदी जगण्याचा प्रयत्न करत हासत असते. 🫠
आणि सार सांभाळून म्हणत असते….बाईपण भारी देवा… बाईपण भारी रं…🥰
‘कर्तुत्व दाखवुन करायचीय सगळ्यांची बोलती बंद रं…🤭 बाईपण भारी देवा बाईपण भारी रं..!
‘संसाराचा गाडा ओढत ठेऊ दोन्ही समान चाकं रं…🫡बाईपण भारी देवा बाईपण भारी रं…!!
दमछाक होतेय घरातलं आवरून पोरं कडेला घेत रं…😛बाईपण भारी देवा…बाईपण भारी रं …!!!
याच जन्मात सुटेल का आम्ही ?खरं सांग देवा रं…🤗 बाईपण भारी देवा बाईपण भारी रं…😄

छोटासा प्रयत्न 🥰✍🏻अनु🥰

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!