July 1, 2025 7:19 am

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, 18 जखमी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

नाशिक मधील कळवण येथे सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी बसमधून प्रवास करणारे २२ जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून अपघात स्थळाच्या दिशेने रवाना झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. बस क्रमांक MH 40 AQ 6259 वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार त्यावेळी ड्युटीवर  होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय, असे खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले. तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!