July 1, 2025 1:33 am

सप्तश्रृंगी अपघातातील जखमींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार

अपनी भाषा में पढ़े! Translate

सप्तश्रृंगी अपघातातील जखमींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार
पुरवण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना
दि. 12 जुलै 2023.

मुंबई, दि. 12 :- नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

आज सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरु असल्याचे सांगत, अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

अमळनेर : सप्तशृंगी गडावर बस खाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येतील महिला आशाबाई राजेंद्र पाटील वय ५० हीचा मृत्यू होऊन इतर १२ महिला जखमी झाल्या आहेत. घटनेचे वृत्त कळताच मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाला आदेश देऊन मुंबई येथून घटनास्थळी रवाना झाले आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!