एकनाथ शिंदे गटाची लवकरच नौका बुडणार ! सर्व उंदिर पळ काढतील !!
वैयक्तिक स्वार्थ साधण्यासा़ठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मदात्या मातापित्या समान शिवसेना या पक्षाशी गद्दारी केली त्याला १३ महिने झाले. गद्दारांना क्षणिक सुख, वैभव व सत्ता मिळतही असेल परंतू ती चिरंजीवी नसते तर अल्पजीवी असते. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याला मिंधे एण्ड ४० गद्दार कसे काय अपवाद ठरू शकतील.
हिन्दीत एक म्हण आहे, जब गिधड की मौत आती है तब वह शहर की ओर दौडता है. शिंदे एण्ड कंपनीची राजकिय मौत जवळ आली तेव्हाच त्यांना गद्दारीची अवदसा आठवली. आणि एका वर्षातच त्यांचे तीन तेरा वाजले. पक्षाशी गद्दारी केली, पक्षप्रमुखाच्या पाठीत खंजीर खुपसला व त्यांच्या जीवघेण्या आजाराचा गैरलाभ घेत पक्ष फोडण्याचे कट कारस्थान रचले, त्यांना निसर्ग वा परमेश्वर तरी कशी साथ देणार ?
मिंधेगिरी, लाचारी व लाळघोटे
पणाच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या. गद्दारी, फितुरीची बक्षिसी म्हणून मिळालेले मुख्यमंत्री पद हे केवळ शोभेचे होते, भाजपा दरबारातील एक हुजरेकरी म्हणुनच त्यांचे स्थान होते. दिल्लीतील बापासमान अमित शाहीच्या इशा-याखेरीज ज्यांचे पानही हालू शकत नाही, त्यांनी स्वाभिमानाच्या गमजा मारू नयेत.
मंत्रीपदाच्या व विविध मंडळांवरील नियुक्तिच्या आशेने लाळ घोटत आलेल्या मिंधे आमदारांना वर्षभर आशेवर ठेऊन अखेर त्यांचा पोपटच केला. एकट्या शिंदेंचे राजकिय पुनर्वसन झाले परंतू इतरांना काय मिळाले ? घंटा !! शिंदेंच्या नादी लागून या आमदारांनी राजकिय आत्महत्याच केली आहे. तसेच गद्दारीचा शिक्का कपाळावर बसला तो कायमचाच.
काहींची इडीची पीडा टळली असेल,आयटी, सीबीआय चौकशी थांबली असेल परंतू सत्ता परिवर्तन होताच पुन्हा फास आवळला जाऊ शकतो,ही भीती कायमच वेताळा सारखी पाठ सोडणार नाही.
भाजप हा कपटी पक्ष आहे. आपल्या लाभासाठी तो कोणाचाही वापर करून नंतर वा-यावर सोडू शकतो. महाराष्ट्रात भाजपाला शह देणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे.हा पक्ष संपविण्यासाठी मिंधेचा वापर कु-हाडीच्या दांड्यासारखा केला.परंतू तो प्रयोग बुमरॅंग सारखा उलटला.
शिवसेना संपवणे तर दूर राहिले उलट सहानूभूतीच्या लाटेमुळे शिवसेना पुर्वीपेक्षा अधिक मजबुत झाली.
त्यामुळे एकनाथ शिंदेसह ४०आमदार भाजपाच्या दृष्टिने निरूपयोगी ठरल्याने हे अवजड व अवघड ओझे भाजपाने भिरकावून देण्याचे ठरवले.
त्या दृष्टीने प्रथम मंत्री मंडळ विस्ताराचे भीजत घोंगडे ठेऊन मिंधे गटाच्या आमदारांत असंतोषाची ठिणगी टाकून दिली.हे कमी म्हणून कि काय – दिल्लीतील अमित शाहीने मिंधे गटातील ९ पैकी ५ मंत्र्यांना वगळण्याचीअट टाकून मिंधेंना खिंडीत गाठले.जे मंत्री स्व पक्षाशी गद्दारी करून फितुर झाले ते काय गोट्यांचा खेळ खेळण्यासाठी ? ते कसे काय मंत्री पदास मुततील ( मुकतील ) ? आणि गद्दारनाथ मिंधेंची काय बिशाद लागुन गेली कि एकाच्याही मंत्री पदाला हात लावायची! ते तर वाटोळं करण्याच्या तयारीत टपुन बसले आहेत.
एकनाथ शिंदे व त्यांच्या मिंध्या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम भाजपाने अलगद केला.रात्री बहुरूपी बनुन भेटणा-या फसवणीसांच्याही न कळत राष्ट्रवादीचे अजित पवार व ४० आमदार फोडून भाजपाने आपली खुंटी बळकट करताना, मिंधे गटाचा
“आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात” हा उर्मटपणा धुळीस मिळवला. शिंदे एण्ड ४० आमदारांची बार्गेनिंग पॉवर झीरो करून टाकली. भाजपा जो उरला सुरला शिळापाका तुकडा देईल तो गुमान घ्या, नाही तर तुम्ही आमच्यासाठी गाजराची पुंगी होतात, वाजली नाही तर खाऊ किंवा फेकुन देऊ! मिंधे होऊन रहायचे तर रहा, नाही तर चालते व्हा! असाच भाजपाचा रोख आहे.
ज्यांना शिव्या देऊन व आरोप करून शिंदे गद्दार झाले त्याअजितदादा पवार व राष्ट्रवादीचे बटिक होऊन मिध्यांना रहावे लागेल. उद्या अपात्रतेचा निर्णय लागला की हे सर्वजण भंगारात जाणार व कवडीमोल होणार ! हा नियतीचा न्याय आहे. गद्दारीच्या वृक्षावर विषारी फळंच येणार ! पेराल तेच उगवते. उद्याहा एकनाथ अनाथ झाला तर एकही आमदार आजू
बाजूला फिरकणार नाही. पहिला उंदिर बाहेर पडेल तो दीपक केसरकर व मग एकापाठोपाठ सर्वजण बाहेर पडतील.एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात
तर सोडा टेंभीनाक्यावर देखील तोंड दाखवण्या योग्य राहणार नाही !
शिंदेंच्या बुडत्या जहाजातून सर्वजण बाहेर पळतील एकमेव श्रीकांत शिंदे हेच पुत्रधर्म पाळण्यासाठी त्यांच्या सोबत असतील.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
११ जुलै २०२३