रयत क्रांती पक्षाच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी सोमनाथ गोरे यांची निवड
(निलेश गायकवाड
भिगवण येथे रयत क्रांती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश गलांडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष वारगड,भिगवण चे सामाजिक कार्यकर्ते समीर नालबंद याच्यां उपस्थितीमध्ये रयत क्रांती पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष पदी सोमनाथ गोरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गलांडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीनंतर गोरे यांनी बोलताना सांगितले रयत क्रांती पक्ष व संघटना माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब यांच्या माध्यमातून व त्यांच्या कामाला नेतृत्वाला प्रेरित होऊन गावगाड्यातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार तसेच संपूर्ण तालुकाभर रयत क्रांती पक्ष संघटनेची बांधणी करणार. त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते पुष्पक पिंपरे व मित्रपरिवार उपस्थित होते.