बागल महाविद्यालय दोंडाईचा येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा
प्रतिनिधी आप्पासाहेब कोळी
श्री शिवाजी प्रसारक संस्थेचे श्रीमती पी. बी. बागल कला व वाणिज्य महाविद्यालय दोंडाईचा येथे आज दिनांक 11 जुलै 2023 रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जाणीव जागृतीसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभागातर्फे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्रीमती व्ही. व्ही. पाटील हे होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एन एल वाल्हे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. श्रीमती व्ही. व्ही. पाटील यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या वाढीचे परिणाम सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार यांनी जगात वाढत जाणारी लोकसंख्या ही भविष्याच्या दृष्टीने किती घातक परिणाम विषद केरेल. प्रंचड गर्दी, स्थलांतरण, शहरीकरण, शेती विभाजन,गरीबी, बेरोजगारी, आरोग्य सुविधा व स्वच्छतेचा अभाव, नैसर्गिक साधन संपदेवर पडत असलेला ताण, पर्यावरण व इतर निगडित समस्या लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे. सन १९२१ मधील भारतीय लोकसंख्या २.३ कोटी होती व आज ही संख्या १४१ कोटी टप्पा ओलांडताना दिसून येत असल्याने जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत चीनला पछाडून भारत पहिल्या क्रमांकावर पोहचला. भारतीयांसमोर वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक अडचणी येत आहे व नवीन समस्या येत राहतील परंतु त्याकडे एक संधी म्हणून पहावे. शिक्षण, प्रशिक्षण व होतकरुना प्रोत्साहन देऊन भारताची ताकद वाढवणे गरजेचे आहे. शेवटी लोकसंख्या वाढीवर नियंत्रन व त्यासाठी “एक परिवार एक संतान” हा संदेश देऊन प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधीत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यादव बोयेवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. प्रवीण पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.