मंत्री अनिल पाटील यांचे अमळनेरात जंगी स्वागत !
विक्की जाधव. 9175050300
राज्यातील भाजप- शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्यावर जळगाव जिल्ह्यातील आ.अनिल भाईदास पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ते पहिल्यांदा अमळनेर येथे आले असता, त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.! यावेळी राष्ट्रवादीच्या आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते नव्याने मंत्रीपदाची शपथ घेणारे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच अन्न व नागरी पुरवठा हे महत्त्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे नामदार अनिल भाईदास पाटील यांचा आज दिनांक ७ जुलै रोजी वाढदिवस असून मंत्री महोदय यांचे अंमळनेर येथे आगमन झाले अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिरात दाखल झाल्यावर तेथे मंगळ देव ग्रहाची आरती करून तेथून नऊ वाजता बाईक रॅली द्वारे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पुढे पैलाड येथून दगडी दरवाजा पाच कंदील चौक सुभाष चौक कुंटे रोड व बस स्टॅन्ड येथून त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन हजारो कार्यकर्तेनी नामदार अनिल भाईदास पाटील यांचे स्वागत केले.