June 30, 2025 9:23 pm

शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत.

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत.
प्राथमिक शिक्षण संचालनायात कास्ट्राईब शिक्षक महासंघाची सहविचार सभा संपन्न.
प्रतिनीधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची सहविचार सभा प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथे नुकतीच संपन्न झाली . यावेळी सहाव्या टप्प्यातील बदली प्रक्रिया रद्द करून तेथील शिक्षकांना मूळ शाळेवर ठेवण्यात यावे तसेच मुख्याध्यापक पदोन्नती करण्यात यावी .शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत व शालेय कामे करण्यासाठी जास्त वेळ मिळावा .
प्रत्येक महिन्याचा पगार १ तारखेला करण्यात यावा इत्यादी शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली .यावेळी शिक्षण उपसंचालक देवीदास कुलाळ , अधीक्षक प्रवीण गायकवाड ,कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे ,राज्य उपाध्यक्ष सत्यदेव खाडे , राज्य सल्लागार दिगंबर काळे ,पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण , बारामती तालुकाध्यक्ष विनोदकुमार भिसे इ .पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!