June 30, 2025 2:26 pm

समृद्धी महामार्गावर अपघात नेमका झाला कसा? धक्कादायक माहिती उघड..

अपनी भाषा में पढ़े! Translate

समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 ही बस समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. यानंतर लगेचच बसने अचानक पेट घेतला. हा अपघात घडताच ड्रायव्हर आणि क्लिनरसह 5 ते 6 प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. यामुळे या भीषण अपघातातून ते बचावले. मात्र, इतर 25 जणांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

बुलढाणा बस अपघातात बसचा चालक दारूच्या नशेत होता, असे अहवालात समोर आले आहे. चालकाच्या रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात चालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. रक्तात अल्कोहोल असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!