दौंडकरांवर घर विकून घरपट्टी भरण्याची वेळ
वाढीव कर आकारणी नोटीस दिल्यामुळे प्रहार अपंग क्रांती आंदोलन दौंड तालुका व शहर आक्रमक
प्रतिनिधी -विकी ओहोळ
8446119158
दौंड – दौंड नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना नवीन वाढीव घरपट्टीची जाहिरात दि.०७/०६/२३ रोजी प्रसिद्ध केली.दौंड नगरपालिकेने सन २०२३-२०२७ अशी ५ वर्षांसाठी नवीन घरपट्टी आकारणी करण्याचे जाहीर केले आहे.व ज्या नागरिकांना, व्यावसायिकांना या नवीन कर आकारणी वर हरकत घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिल्याचे दौंड नगरपालिकेने आवाहन केले आहे. परंतु याचा कडाडून विरोध प्रहार अपंग क्रांती आंदोलन दौंड शहर व तालुका यांनी केला असून जर ग्रामपंचायत, पंचायत समिती अपंग, दिव्यांग यांना घर पट्टी,पाणी पट्टी माफ करू शकते तर नगरपरिषद का नाही करू शकत .दिव्यांगाना किमान रोजगार उपलब्ध नाही त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे अशा परिस्थिती मध्ये घरपट्टी भरण्यासाठी राहती घरे विकुन घर पट्टी भरावी लागेल अंदाजे ४०% वाढ रहिवासी इमारतींसाठी मागील वर्षीच्या घरपट्टी मध्ये करण्यात आली आहे. व व्यावसायिकांना मागील वर्षाच्या चार पट वाढीव घरपट्टी आकारण्यात आली आहे.अनेक भागातील नागरिकांना, मूलभूत सोयी सुविधा मिळत नाही,पायाभूत विकास कामे झालेली नाही .रस्ते, पाणी, वीज,इ सुविधा नाही.आरोग्य,सार्वजनिक शौचालये,बगिचा,उद्याने नाहीत
नगरपरिषद एक दिवसा आड पाणी पुरवठा याद्वारे सहा महिने पाणी पुरवठा करते व पूर्ण एक वर्षाची पाणीपट्टी आकारते .असा आरोप या संघटनेने केला असून इतर नागरिकांसाठी पूर्वीचीच घरपट्टी आकारून दिव्यांगाना कर आकरणीतून वगळावे अशी मागणी केली आहे.
यावेळी पुणे उपजिल्हा अध्यक्ष रामेश्वर मंत्री,दौंड शहर अध्यक्ष अनिल गुजर, दौंड शहर उपाध्यक्ष सलीम तांबोळी,दौंड शहर महिला अध्यक्ष शहनाज शेख व इतर प्रहार कार्यकर्ते सुवर्णा सोनवणे,रेणुका चव्हाण,सविता चव्हाण,संगिता हिरणवले,चांदणी खान,प्रल्हाद रणधीर उपस्थित होते.