माझा व माझ्या मुलांचा सांभाळ करणार का ? शिवाय दिलेले पैसे परत दे असा तगादा लावल्याने महिलेची हत्या;अवघ्या काही तासात आरोपीला ठोकल्या भिगवण पोलिसांनी बेड्या
(निलेश गायकवाड )
इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील मदनवाडी परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता.अखेर या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं भिगवण पोलिसांच्या तपासात समोर आलयं…… या प्रकरणी भिगवण पोलिसांनी एकाला अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.काळु उर्फ दादा श्रीरंग पवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.
मंगळवारी सकाळी मदनवाडी परिसरातील एका विटभट्टदी जवळ गंगुगाई उर्फ वैशाली कल्याण काळे या ४० वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणचा भिगवण पोलीसांनी कसून तपास करत या घटनेचा उलघडा केला आहे.
सदर मृत महिला ही आरोपीकडे माझा व माझ्या मुलांचा सांभाळ करणार का ? शिवाय दिलेले पैसे परत दे असा तगादा लावत होती.यातून चिडलेल्या श्रीरंग पवार याने ता महिलेचा गळा दाबून तीची हत्त्या केली त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या महिलेला त्याने पेटवून दिले.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, विनायक दडस-पाटील,रूपेश कदम, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले,अंकुश माने हसीम मुलाणी यांनी केली आहे.