अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे कीर्तनकार;वयाच्या पाचव्या वर्षांपासून कीर्तन करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांचे मदनवाडी येथे होणार भव्य कीर्तन सोहळा
(निलेश गायकवाड )
“बोला पुंडलिक वरदे…..हरी विठ्ठल”
किर्तनकार म्हणलं की आपल्याला हे शब्द आठवतात. कीर्तनाची परंपरा, कीर्तनाच्या माध्यमातून होणारे समाज प्रबोधन, जुन्या विचारांची आणि सद्य परिस्थितीची सांगड घालत कीर्तनकार मनोरंजन आणि समाज प्रबोधन करतात.
संत परंपरेविषयी अभ्यास, प्रभावी बोलण्याची शैली, ग्रामीण भाषेचा लहेजा, हजरजबाबीपणा या सगळ्यामुळे आजही ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम होतात आणि लोक आवर्जून ऐकायला उपस्थित असतात.
म्हणून मदनवाडी येथे उद्या दि.09/06/2023 रोजी सायंकाळी 7 ते 9 वा.स्थळ -धनबाबा मंदिर, बंडगर वस्ती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव वतीने पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा किर्तनकार शिवलीला पाटील यांच्या जाहीर किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयेाजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवलीला पाटील या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुयातील असून, त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हे सुद्धा वारकरी संप्रदायातील कीर्तनकारच आहेत. वडिलांकडून कीर्तनाचा वारसा मिळालेल्या शिवलीला या वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तन करत आहे. ग्रामीण भाषेतून अगदी विनोदी पद्धतीन त्या कीर्तन करतात. त्यांनी आतापर्यंत विविध शहरात एक हजाराहुन अधिक किर्तने केली असून, सप्टेंबर २०२१ मध्ये, शिवलीला पाटील यांना टीव्ही रियालिटी शो बिग बॉस मराठी ३ मध्ये एक स्पर्धक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
शिवलीला या वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तन करतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांमध्ये शिवलीला यांचे नाव घेतले जाते. इतकेच काय तर अगदी सोशल मिडियावरही त्यांची कीर्तने खुप प्रसिद्ध आहेत.
तरी श्रोत्यांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयेाजकांच्या वतीने करण्यात आले आहे.