July 1, 2025 12:55 pm

साप्ताहिक विंगचे अधिवेशन १८ जूनला छत्रपती संभाजीनगरात

अपनी भाषा में पढ़े! Translate

साप्ताहिक विंगचे अधिवेशन १८ जूनला छत्रपती संभाजीनगरात

व्हॉईस ऑफ मीडियाच्या छत्राखाली एकवटणार पत्रकार

प्रतिनिधी-शेखर सिरसाठ

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील साप्ताहिकांचे मालक, संपादक आणि पत्रकारांचे राज्यव्यापी अधिवेशन रविवार, १८ जून रोजी छत्रपती संभाजी नगरात होणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्याच्या साप्ताहिक विंगचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद बोरे यांनी ही माहिती दिली.

छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम ट्रस्ट येथे हे एक दिवसीय राज्यस्तरावरील अधिवेशन नियोजित आहे. रविवार, १८ जून २०२३ रोजी वेगवेगळ्या सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे. पहिल्या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे थाटात उद‌्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर साप्ताहिक विंगमधील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते साप्ताहिकांचे मालक, संपादक आणि पत्रकारांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील कामांचा आढावा यावेळी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध विषयांवर ठराव पारित करण्यात येतील. साप्ताहिकांच्या मालक, संपादक, पत्रकारांना अधिवेशनादरम्यान विमा कवच प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी साप्ताहिक विंगची संपूर्ण राज्य कार्यकारिणी कामाला लागली आहे. भव्यदिव्य अशा स्वरुपाचे अधिवेशन व्हावे, यासाठी साप्ताहिक विंगची पूर्ण कार्यकारिणी प्रयत्न करीत आहे.
—–
साप्ताहिकांनाही न्याय मिळणार

बदलत्या पत्रकारितेनुसार साप्ताहिकांवर विविध प्रकारे अन्याय होत आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून साप्ताहिक व त्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनात साप्ताहिकांच्या पत्रकारांनी आपल्या न्याय लढ्यासाठी सहभागी व्हावे.

– अनिल म्हस्के
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
व्हॉईस ऑफ मीडिया
—–
अधिवेशन भव्यदिव्य होणार

व्हॉईस ऑफ मीडियाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पत्रकारांचे व त्यांच्या परिवाराचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करीत आहोत. साप्ताहिक विंगची संपूर्ण राज्य कार्यकारिणी अधिवेशन भव्यदिव्य व्हावे, यासाठी प्रयत्न करीत आहे.

– विनोद बोरे
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
व्हॉईस ऑफ मीडिया, साप्ताहिक विंग

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!