“बीजेएस च्या प्रचार रथाला जिल्हाधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी”
जलसाठे पुनरुज्जीवन मोहिमेची चंद्रपूर जिल्हात जनजागृती
प्रतिनिधी-विजय केळझरकर
चंद्रपूर भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील गावामध्ये जलसाठे पुनरुज्जीवन मोहिम राबविण्यात येणार असून, मंगलवार दि. १६.०५.२०२३ रोजी चंद्रपूर येथे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी भारतीय जैन संघटनेच्या प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविली..
जिल्ह्यातील गावामध्ये तलाव, पाझर तलाव, मामा तलाव, गाव तलावातील गाळ काढून स्थानिक शेतकऱ्यांचा सहकार्याने गाळ काढून शेतात टाकण्याकरिता घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर उपक्रमामुळे जलसाठ्याचे खोलीकरण होऊन पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.तसेच शेतकऱ्याचा शेतीचा कस वाढणार आहे. सदर योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हात आनंद नागरी बँक परिवार यांच्या सौजन्याने प्रचाररथ काढण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विनय गोंडा सर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली… यावेळी
मनपा आयुक्त श्री विपिनजी पालीवार , उपजिल्हाधिकारी रोहयो पल्लवी घाटगे मॅडम, जिल्हा जलसंधारण अधिकारी- मृद व जलसंधारण विभाग आर आर बहूरिया, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरीष कालकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी लपा कु. प्रियंका रायपुरे मॅडम, जलसंधारण अधिकारी श्री सारंग धकाते सर तसेच श्री. महेंद्रजी मंडलेचा(भारतीय जैन संघटन राज्य उपाध्यक्ष), श्री दीपक पारख ब्रॅंड एम्बेसडर (यांच्या मार्गदर्शनाखाली ),श्री. गौतमजी कोठारी(भारतीय जैन संघटन-चंद्रपूर जिल्हाध्यक्ष),श्री. अभिषेकजी कास्टीया (भारतीय जैन संघटन पूर्व विदर्भ सदस्य ), श्री. द्विपेंद्रजी पारख(भारतीय जैन संघटन- चंद्रपूर शहर अध्यक्ष),
श्री. अनिकेतजी लुनावत(भारतीय जैन संघटन चंद्रपूर शहर सदस्य), दिक्षांतजी बेले (BJS चंद्रपूर जिल्हा समन्वयक)
उपस्थित होते.