रिपब्लिकन सेना राजकीय पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महासचिव पदी पद्माकर जाधव तर इंदापूर उपाध्यक्ष पदी हनुमंत सुतार यांची नियुक्ती
(निलेश गायकवाड)
दिनांक १४/५/२०२३ रोजी बारामती येथे रिपब्लिकन सेना राजकीय पक्षच्या विविध पदांवर निवडी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा किरणजी घोंगडे यांच्या आदेशानुसार व मा धुराजी शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका महासचिव पदी मा पद्माकर जाधव यांची तर इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी मा हनुमंत सुतार, व बारामती तालुका अध्यक्ष पदी मा उमेश भिकाजी साळवे तसेच बारामती तालुका उपाध्यक्ष मा सचिन गायकवाड यांना निवडीचे पत्र देण्यात आले हा कार्यक्रम मा प्रशांत विष्णू सोनवणे पुणे जिल्हा महासचिव याच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक बारामती येथे संपन्न झाला. त्या वेळी मा गणेश चव्हाण पुणे जिल्हा अध्यक्ष मा गणेश भोसले पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा सौ कांचन भोसले पुणे जिल्हा युवती अध्यक्षा सौ रुक्मिणीताई चव्हाण बारामती शहर महिला आघाडी अध्यक्षा मा हनुमंत बनसोडे इंदापूर तालुका अध्यक्ष मा रोहित जगताप भिगवण शहर अध्यक्ष व बारामती इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.