November 21, 2024 9:27 pm

शिरपूर शहर पो.स्टे.चे डी.बी. पथकाची धडक कारवाई; लाखोंची सुगंधीत तंबाकुसह आयसर वाहनासह ०१ आरोपी जेरबंद..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : शिरपूर शहर पोस्टे चे पोनि आगरकर यांना दि. २६/०४/२०२३ रोजी १४.४५ वाजेचे सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ से इंदौरकडून शिरपुरकडे आयसर वाहन क्र. एच. आर. ४६ ई.१९६९ असे वाहन येत असुन त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधी तंबाखूचा माल भरलेला आहे.

त्यानुसार पोनि आगरकर सो यांनी डी. बी. पथकाचे पो हे कॉ ललीत पाटील यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पो हे कॉ ललीत पाटील यांनी डी. बी. पथकासह चोपडा फाटा, कळमसरे शिवार ता. शिरपुर जि. धुळे येथे पंचासह सापळा लावला असता राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडून शिरपूरकडे येणारे आयसर वाहन क्र. एच. आर. ४६/१९६० असे १५.३० वाजेचे सुमारास शिताफीने पकडले असता सदर वाहनावरील चालक अशोक आजादसिंग ३४ रा. बाळंद ता.जि. रोहतक राज्य हरियाणा हा सदर वाहनात मोबाईल टॉवरचे मालाचे आडोशास २४.००,०००/- .कि.चो सुगंधीत तंबाकु माल भरलेले पांढन्या रंगाचे पट्टयाचे ४० खोके नेतांना मिळून आल्याने सदरचा माल महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असल्याने सदर मालासह २०,००,०००/- रू. कि.चे आयसर वाहन क्र. एच. आर. ४६/६.१९६९ सह एकूण ४४,००,०००/- रू. कि. चा मुद्देमाल ताब्यात घेवून सदर बाबत निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांना पत्रव्यवहार केल्यानुसार किशोर हिम्मतराव बावीस्कर अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांनी शिरपूर शहर पो.स्टे. ला येवून वरील वाहनाची व वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती सरकारतर्फे फिर्याद होवून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (२) (iv), २७ (३) (d). ३० (२) (a), ३ (१) (22) (1) (१) (zz.) (v) चे उल्लंघन केलेले असुन ५९ (i) अन्वये तसेच भादंवि कलम १८८, २७२, २७३३२८ अन्वये गुन्हा दाखल करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदर गुन्ह्यात आरोपी नामे अशोक आजादसिंग बडख वय ३४ रा. बाळंद ता.जि. रोहतक राज्य हरियाणा पास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोनि आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोठनि/ गणेश कुटे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शना खाली श्री. ए. एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर, पोउनि / गणेश कुटे, संदिप मुरकुटे, तसेच डी. बी. पथकाचे पोहेका/ललीत पाटील, लादूराम चौधरी, पोना/मनोज पाटील, पोकों/विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रविण गोसावी, सचिन वाघ, भटू साळुंके, तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!