गणेशवाडीत दोन दिवसीय भैरवनाथ यात्रा संपन्न
यात्रेनिमीत्त मैदानी कुस्ती आखाडयात नामंकित मल्लांनी लावली हजेरी,
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत.गणेशवाडी दोनदिवसीय भैरवनाथ यात्रा उत्सव मोठया आनंदात पार पडली.पहिल्या दिवसी डिजेच्या सुरात गाव मिरवणुकीत नाथांच्या पालखीचं आयोजन मोठया उत्सवात पार पडले. यानंतर नऊ वाजता सुरेखा पुणेकरांचा तमाश्या मनोरंजनासाठी आयोजन केले होते.
दुसऱ्या दिवशी मैदानी कुस्ती आखाडा भरवण्यात आला होता.यामध्ये महाराष्ट्रातील नामंकीत विविध मल्लांनी हजेरी लावली.विविध नामंकित पैलवानांच्या कुस्ती पाहण्यासाठी आजुबाजुचा परिसर फुल्ल आसा गजबजला होता.
यात्रा उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.हा उत्सव व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी गावकरांसह भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीं यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले.यात्रेनिमित्त गणेशवाडी परिसर लोकगर्दीने दुमदुमला होता.