फुले,शाहू डॉ.आंबेडकरांच्या विचाराचे खरे अनुयायी डॉ कुमार व डॉ पंचशीला लोंढे हे दाम्पत्य आहे- मा.तुषार मोहिते आयकर आयुक्त
निरा नरसिंहपुर :दिनांक-28 प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
सोलापूर जिल्ह्यातील
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्राचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटक/अध्यक्ष मा.तुषार मोहिते साहेब (आयकर आयुक्त IRS, IAS) यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उदघाटक तुषार मोहिते साहेब म्हणाले “फुले,शाहू व डॉ.आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी व खरे कार्य डॉ.कुमार लोंढे व पंचशीला लोंढे करत आहेत”.मी ही प्रतिकूल परिस्थितीत शिकलो.आई मजुरी व वडील गवंडी काम करत होते.बाबासाहेब यांच्या दोन गोष्टी मला प्रचंड प्रेरणा द्यायच्या एक म्हणजे अठरा तास अभ्यास व लंडन मध्ये पावाच्या तुकड्यावर केलेली गुजराण त्यामुळे तुमच्यात धमक पाहिजे.तुमचे आवडते क्षेत्र त्यामध्ये करिअर करा! मी माझ्या मामामुळे घडलो पहिल्या प्रयत्नात IRS व दुसऱ्या वेळी IAS झालो त्यावेळी माझी मुलगी दोन वर्षाची होती.डॉ.कुमार लोंढे तुम्ही जे काम करत आहात ते योग्य आहे समाजाला तुमच्यासारखी लोक मिळणं हे सुद्धा समाजाचं भाग्य आहे मी नक्की मदत करेन कारण माझे ज्याच्याशी ऋणानुबंध जुळतात त्यांना मी कधी सोडत नाही.अठरा तास अभ्यास अभियान मध्ये बसणारी मुले ग्रेट आहेत.दोन महिन्यांचा पगार संस्थेला देणारी भगिनी थोर आहे, हे बोलतांना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय.डॉ आंबेडकरांच्या एका विचाराने माझ्या आयुष्याच सोन झालं आहे. आम्ही पाया पडतो,जयंती करतो पण बाबासाहेब वाचत नाही त्यामुळे डॉ कुमार लोंढे जे कार्य करत आहेत ते महापुरुषांच्या विचाराचं कार्य आहे सर तुम्ही करत राहा! असे मनाला भावणारे अंतकरणला हेलावा देणारे मनोगत त्यानी यावेळी व्यक्त केले.जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे डॉ आंबेडकरांचे पुस्तक कार्यक्रम स्थळी साहेबांच्या वतीने मोफत देण्यात आले.
प्रकल्प अधिकारी प्रणिती कांबळे यांनी अभ्यासिका व समाजकल्याण याबाबत मार्गदर्शन केले तर अस्तित्व संस्था चे शहाजी गढहिरे यांनी अकरा हजार रु मदत संस्थेस दिली.
यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव,शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील यांनी आपल्या भाषणातून उपस्थित यांची मने जिंकली. विक्रीकर निरीक्षक कोमल सावंत,नायब तहसीलदार सिद्धार्थ गायकवाड,पंकज लोंढे (राज्यात पाचवा अ जा mpsc),अठरा तास अभ्यास,गुणवंत विद्यार्थी,फार्मसी,शिष्यवृत्ती असे प्रावीण्य मिळवलेल्या चा विशेष सत्कार तुषार मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला
कार्यक्रमास ऍड धनंजय बाबर,समतादूत किरण वाघमारे,चांदापुरी सरपंच जयवंत सुळ, तरंगफल सरपंच नारायण तरंगे,वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे,रिपाई चे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,रणजीत सातपुते, प्रसिद्ध उद्योगपती भैय्या बाबर,शाळा समिती चे जितेंद्र देठे,बाळासाहेब जाडकर,सेंट्रल ह्यूमन राईट चे सदानंद बनसोडे,भीमराव चंदनशिवे,सचिन दळवी,डॉ.लोखंडे,सुजित तरंगे,दत्तात्रय कांबळे पाटील ,शशी साळवे,मोहन करडे,डॉ.तुकाराम ठवरे, इ मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य कुंडलिक साठे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.राजेश वायदंडे,प्रा.अल्ताफ पठाण,अरुणा मॅडम,काळे मॅडम,आप्पा धुमाळ सर यांनी विशेष परिश्रम घेतले.