June 29, 2025 9:20 pm

कर्नाटकचा सर्वांगिण विकाससाठी राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आण्यासाठी पी. राजीव यांना निवडुन द्या – माजी मुख्यमंत्री येडुरआप्पा

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्नाटकचा सर्वांगिण विकाससाठी राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आण्यासाठी पी. राजीव यांना निवडुन द्या – माजी मुख्यमंत्री येडुरआप्पा

शिरपूर : कर्नाटक राज्याचा सर्वांगिण विकाससाठी राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आण्यासाठी कुळची विधानसभा भाजपा उमेदवार आ. पी. राजीव यांना निवडुन द्यावे असे आवाहान कर्नाटक भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडुरआप्पा यांनी केले. कुळची विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार आमदार पी. राजीव यांचा प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या धामधुम सुरु असुन कुळची विधान सभा मतदार संघातील भाजपा उमेदवार आमदार पी. राजीव यांचा प्रचारासाठी कुळची येथे भाजपा कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजुर, दिनदलित, आदिवासी यांचा दि. २६ एप्रिल रोजी मेळावा घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री येडुरआप्पा पुढे म्हणाले की, कर्नाटक राज्यात अनेक वर्ष काॅग्रेस, जनता दलची सत्ता होती या काळात राज्याचा विकास झाला नाही, मात्र मागील भाजपा राज्यवटीत राज्यात अनेक विकास कामाला गती देण्यात आली त्यामुळे राज्य प्रगतीपथावर आहे पुढील काळात राज्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व राज्यात भाजपाची सत्ता येण्यासाठी कुळची विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार आ. पी. राजीव यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडुन द्यावे असे येडुरआप्पा यांनी आवाहान केले. कुळची विधानसभा सह प्रभारी तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात व कर्नाटक राज्यत डबल इंजिन सरकारने विकास केला असल्यामुळे आपले उमेदवाराला निवडुन आण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचारात सक्रीय होवुन प्रभावीपणे काम करावे, आमदार पी. राजीव यांच्या कार्यामुळे कुळची हे कर्नाटक राज्याचे विकासचे मॉडेल बनले आहे. कर्नाटक राज्यात आपल्याला पुन्हा भाजपाची सत्ता आणायची आहे, या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. शेवटी उमेदवार आ. पी. राजीव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मतदार व कार्यकर्ते यांनी गेली दहा वर्ष म्हणजे दोनदा मला निवडुन दिले असुन मी मतदार संघाचा पुरेपुर विकास केला आहे आता हि मला निवडुन दिल्यास आता आहे त्यापेक्षा जास्त विकास काम करु असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मेळाव्यात व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडुलआप्पा, कुळची विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार आमदार पी. राजीव, कुळची विधानसभा सह प्रभारी तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, महाराष्ट्राचे माजीमंत्री सोलापुरचे आ. विजयकुमार देशमुख, बेळगांव भाजपा जिल्हाध्यक्ष डाॅ. राजेश नेरले, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, कुळची भाजपा तालुकाध्यक्ष मलिकार्जुन खानगौडा, तालुका सरचिटणीस मलगौडा पाटील, सांगलीचे नगरसेवक नागेश भोंगडे, नरेंद्र काळे, प्रदीप वाले हे उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!