June 30, 2025 3:28 am

समता सैनिक दलाच्या इंदापूर तालुका प्रवक्ते पदी प्रा. ऋषिकेश दळवी सर यांची निवड.

अपनी भाषा में पढ़े! Translate

समता सैनिक दलाच्या इंदापूर तालुका प्रवक्ते पदी प्रा. ऋषिकेश दळवी सर यांची निवड.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 26 ;प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

इंदापूर तालुक्यामध्ये झालेल्या समता सैनिक दलाच्या बैठकीमध्ये समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष आयु.अशोक पोळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नियुक्ती सोहळा पार पडला.सामाजिक व धार्मिक चळवळीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा.दळवी सर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली.समता सैनिक दल या महामानव बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या मातृ संघटनेमध्ये अतिशय ताकतीने काम करू, समाजातील शोषीत ,वंचित घटकांना न्याय देऊन त्यांना या संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू,बाबासाहेबांना अभिप्रेत सैनिक घरा घरात तयार करू,असे निवडीनंतर प्रा.दळवी यांनी आपले मत व्यक्त केले.तसेच या वेळी मेजर गायकवाड यांची इंदापूर तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.निवडी प्रसंगी सुभेदार तानाजी राव मोरे इंदापूर तालुका अध्यक्ष,समोहन तज्ञ इंदापूर तालुका संपर्क प्रमुख सूर्यकांत चव्हाण सर , सचिन चंदनशिवे इंदापूर तालुका संघटक,निलेश साबळे सल्लागार इंदापूर तालुका,तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी पोळ हे उपस्थित होते.अतिशय आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!