July 1, 2025 7:02 am

सोशल मीडिया माध्यमातून कोयता गॅंगची दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक.

अपनी भाषा में पढ़े! Translate

सोशल मीडिया माध्यमातून कोयता गॅंगची दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक
माळेगाव बुद्रुक पोलिसांची कडक कारवाई

बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)
स्वप्निल महादेव देवळकर वय 23 राहणार शिवनगर माळेगाव कारखाना तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 387/22 भारतीय दंड विधान संहिता कलम 307,34 प्रमाणे गुन्हा दाखल असून या आरोपीने इंस्टाग्राम च्या माध्यमातून इंस्टाग्राम स्टोरी मध्ये स्वतःचा फोटो अपलोड करून त्यावर कोयता गॅंग माळेगाव बुद्रुक ,302 असे कॅप्शन टाकून माळेगाव बुद्रुक व परिसरामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत असताना यात्रा कालावधीत फिर्यादी व साक्षीदार यांचे वर हल्ला करणार असले बाबत माहिती मिळाल्यावर माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर पोलीस शिपाई अमोल राऊत ,नितीन कांबळे यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन त्यास त्याचे हातून दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151 प्रमाणे अटक करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
माळेगाव पोलीस ठाणे अंतर्गत असे कोण दहशत पसरवत असल्यास त्यांच्यावरही यापुढे अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!