July 1, 2025 1:31 am

इंदापूर तालुक्यामध्ये युवा सेनेच्या( शिवसेनेच्या )शाखांची उद्घाटना विविध गावांमध्ये ….

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर तालुक्यामध्ये युवा सेनेच्या( शिवसेनेच्या )शाखांची उद्घाटना विविध गावांमध्ये करण्यात आली.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 16 ;प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या शाखांची उद्घाटने विविध गावांमध्ये करण्यात आली. नीरा नरसिंहपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन हे माजी सरपंच अण्णासाहेब काळे यांनी केले होते.या शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ही शिवसेना उपनेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे, माढा विधानसभा संपर्कप्रमुख संजय बाबा कोकाटे, प्रदीप मामा युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप मामा जगदाळे, पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे, इंदापूर तालुका प्रमुख महारुद्र पाटील , बारामती विधानसभा संपर्कप्रमुख ऍडव्होकेट सौ. गीतांजली ढोणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.सीमाताई कल्याणकर, इंदापूर तालुका युवा सेना प्रमुख अण्णासाहेब काळे आदींच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंदापूर तालुका युवासेना प्रमुख अण्णासाहेब काळे यांचे धडाडीचे तोफ असणारे भाषण झाले त्यांच्यानंतर इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख महारुद्र पाटील यांचेही मार्गदर्शन झाले.
या कार्यक्रमांमध्ये निरा नरसिंहपूर मधील शाखेचे उद्घाटन केले. यावेळी विविध मान्यवरांची भाषेत झाली.शेवटी विजय बापू शिवतारे यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी सांगितले की आम्हाला गोरगरीब जनतेला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. यासाठी आम्ही शिवसेना आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांची कामे मार्गी लावून जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून देणार आहोत तरुणांना, बेरोजगार युवकांना, महिलांना तसेच वेगवेगळे व्यवसाय व उद्योग करणाऱ्यांना उद्योग व व्यवसाय उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देणार आहोत. यासाठी नवयुवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करून आपले राज्य हे सुजलाम सुफलाम करणार आहोत.
या उद्घाटनाच्या वेळी संतोष मोरे, रूपचंद जाधव, नितीन सरवदे, सागर इंगळे, गौरव जगदाळे, नानासाहेब काळे, सोनू मोरे , इरफान शेख, लखन जाधव, युवा सेना सचिव पोपट क्षीरसागर, सचिन कदम, धनंजय पवार, गणेश जगदाळे, राहुल माने, अमोल काळे, सुधीर क्षीरसागर, अक्षय निकम, विकी मगर, संतोष घुले, विनोद मोहिते, मायप्पा घोडके, बाळू हावळे, अतुल घोगरे, बापू जाधव, किशोर कोळी, गणेश जाधव, विठ्ठल धोत्रे, देवाभाऊ सरवदे, सोमा काळे, रोहित साळुंखे, मदन सरवदे, राहुल ढवण,निखिल मगर आदी मान्यवर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!