क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरू शिष्य जयंती निमित्त पासलकर वसाहत लिंगाळी येथे नागरिकांसाठी सवलतीच्या दरात आधार,आभाकार्ड काढून देण्यात आले.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. न.- 8446119158
दौंड – दौंड शहरातील पासलकर वसाहत (लिंगाळी) येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुरू शिष्य जयंतीनिमित्त आज दिनांक १६/४/२०२३ रोजी काळ भैरवनाथ मंदिर पासलकर वसाहत लिंगाळी येथे गुरू शिष्य जयंतीनिमित्त खास ऑफर मध्ये नवीन पॅन कार्ड पॅन कार्ड दुरुस्ती आभा कार्ड ,ई श्रमकार्ड,आयुष्यमान भारत कार्ड, मतदान नोंदणी फॉर्म भरणे इत्यादी कामे सवलतीच्या दरात करून दिले.
कार्यक्रमाचे उद्घाटन लिंगाळी गावच्या पोलीस पाटील सौ. निता वाघमारे यांच्या हस्ते झाले व
कार्यक्रमाचे आयोजन मा.दिपक वाघमारे ,जिवन भंडारे, विशाल ओहोळ, मनोज पासलकर, अजित फुटाणे ,देवा शिंदे ,पप्पू पवळे, अशोक पासलकर , विशाल शिंदे , पासलकर वसाहत लिंगाळी ग्रामस्थ यांनी केले व समता इंटरप्राईजेस च्या मालक सौ.पुजा मिसाळ , अशोक मोरे यांचा सेट अप मिळाला या ऑफर चा परिसरातील 110 नागरिकांनी लाभ घेतला.